Join us  

रिक्षातून प्रवास करताना फोटोग्राफरने केला पाठलाग, तापसीची उडाली घाबरगुंडी! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:34 AM

तापसी आनंदात मुंबई रिक्षात प्रवास करत होती. इतक्यात एका व्यक्तीने तिचा पाठलाग केला. मग पुढे काय घडलं बघा (taapsee pannu)

तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. तापसीला आपण आजवर अनेक भूमिका करताना पाहिलंय. तापसीने काहीच दिवसांपुर्वी लग्नाची खुशखबर सर्वांना सांगितली. तापसी वैयक्तिक आयुष्यात पापाराझींसोबत कायम हशामस्करी करताना दिसते. अशातच तापसीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात एका पापाराझीने तापसीच्या रिक्षाचा पाठलाग केला. त्यामुळे तापसी प्रचंड घाबरली. पुढे काय घडलं बघा.

झालं असं की.. तापसी काल रात्री मुंबईत तिच्या मैत्रिणीसोबत रिक्षातून प्रवास करत होती. ती शांतपणे मैत्रिणीसोबत रिक्षाचा आनंद घेत होती. अशातच एक पापाराझी तिच्या रिक्षाचा पाठलाग करत आला. आणि तो थेट समोर उभा राहून तापसीचे फोटो काढायला लागला. अचानक पापाराझी समोर उभा राहिल्यावर तापसी दचकली. 'शांतपणे ऑटोमधून प्रवास करुदे यार', 'अरे अपघात होईल सांभाळून! अपघात झाला तर माझं नाव येईल', असं तापसी त्याच्याशी संवाद साधताना दिसली. 

काही दिवसांपूर्वी तापसीने बॉयफ्रेंड मॅथियस बोसोबत लग्न केले होते. हे लग्न इतकं गुपचुप होतं की कोणालाही सुगावा लागला नाही. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. आता तापसीकडे 3 चित्रपट आहेत जे रिलीजसाठी तयार आहेत. तापसी आता 'फिर आयी हसीन दिलरुबा' आणि 'खेल' या सिनेमांमध्ये दिसणार आहे. हसीन दिलरुबाच्या पहिल्या भागात तापसीसोबत विक्रांत मस्सी आणि हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :तापसी पन्नूबॉलिवूडमराठी