सुजलेला चेहरा, डोळ्याखाली डार्क सर्कल..., Urfi Javedची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 18:41 IST
अभिनेत्री उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिची अवस्था पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.
सुजलेला चेहरा, डोळ्याखाली डार्क सर्कल..., Urfi Javedची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सातत्याने अतरंगी फॅशन स्टाईलमुळे चर्चेत येत असते. तिच्या चित्रविचित्र स्टाईलमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत येत होती. मात्र आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिची अवस्था पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.
अभिनेत्री उर्फी जावेदने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्रीचा चेहरा गंभीरपणे सुजलेला आहे. बोल्ड ब्युटी खुद्द तिचा चेहरा एवढा का सुजला आहे हे पाहून आश्चर्यचकित झाले आहे. या व्हिडिओमध्ये ती एका मित्रासोबत बसली असून तिसरी व्यक्ती व्हिडिओ शूट करत आहे.
या व्हिडिओतील अभिनेत्रीचा चेहरा पाहून असे वाटते की तिला संसर्ग झाला आहे किंवा तिच्या चेहऱ्याला कीटक चावला आहे. प्रचंड सूज किंवा फुगल्यामुळे तिची ओळख पटवणेही कठीण झाले आहे. आपल्या चेहऱ्याचा व्हिडिओ शेअर करताना उर्फीने स्वतः लिहिले आहे की, त्याचा चेहरा अचानक कसा सुजला हे समजत नाही.
उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.