Join us  

Swayamvar Mika Di Vohti : कन्फर्म! 45 वर्षांच्या मिका सिंगनं निवडली ‘दुल्हनिया’, आकांक्षा पुरीच्या गळ्यात घातली वरमाला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 10:38 AM

Swayamvar Mika Di Vohti Winner : अखेर मिका पाजीला त्याची दुल्हनियां मिळाली. होय, दीर्घ प्रतीक्षेनंतर बॉलिवूड सिंगर मिका सिंगने त्याची होणारी वधू निवडली आहे.

Swayamvar Mika Di Vohti Winner : अखेर मिका पाजीला त्याची दुल्हनियां मिळाली. होय, दीर्घ प्रतीक्षेनंतर बॉलिवूड सिंगर मिका सिंगने  (Mika Singh) त्याची होणारी वधू निवडली आहे. मिका त्याच्या अनेक वर्षाच्या मैत्रिणीला आयुष्याची जोडीदार म्हणून निवडलं आहे. होय, ‘स्वयंवर- मिका दी वोटी’मध्ये आकांक्षा पुरी, प्रांतिका दास आणि नीत महल या तीन टॉप 3 कंटेस्टंटपैकी आकांक्षा पुरीनं (Akanksha Puri) बाजी मारली आहे. आकांक्षाने मिकावरच्या प्रेमाची कबुली दिली आणि मिका तिच्यावर फिदा झाला. यानंतर आकांक्षा हीच ‘मिका दी वोटी’ ठरली.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातील 12 तरूणी मिकाची ‘दुल्हनिया’ व्हायला ‘स्वयंवर- मिका दी वोटी’या शोमध्ये आल्या होत्या. शो जसं जसा पुढे गेला, तशा त्यात काही वाईल्ड कार्ड एन्ट्रीही आल्यात. आकांक्षा पुरी हिनेही शोमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती. आकांक्षा भलेही उशीरा शोमध्ये आली, पण ती मिकाचं मनं जिंकण्यात यशस्वी झाली. नीत महल व प्रांतिका दास या दोघींच्या तुलनेत आकांक्षा हीच आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे समजू शकते. तिच्याशिवाय अन्य दुसरी कोणीही आपली लाईफ पार्टनर होऊ शकत नाही, याची जाणीव मिकाला झाली आणि त्याने लाईफ पार्टनर होण्यासाठी आकांक्षाची निवड केली.

कोण आहे आकांक्षा पुरी?आकांक्षा पुरी ही मिकाची जुनी मैत्रिण आहे. मध्यंतरी दोघांच्या रिलेशनशिपच्या आणि लग्नाच्या अफवाही चर्चेत होत्या.  ती मिकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. आकांक्षाने वाईल्ड कार्ड म्हणून शोमध्ये एन्ट्री घेतली होती. माझी व मिकाची 10 ते 12 वर्षांपासून मैत्री आहे. मिकाला अन्य मुलींसोबत बघून माझा फार जळफळाट झाला होता. त्याक्षणी मी मिकावर प्रेम करते, याचा साक्षात्कार मला झाला आणि मी शोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असं आकांक्षाने सांगितलं होतं.

 मिका लगेच करणार नाही लग्न?स्वयंवर सुरू होण्याआधी, मी लगेचच लग्न करणार नाही, असं मिकाने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मिका आधी एन्गेजमेंट करेल, यानंतर एकमेकांना समजून घेऊन निवडलेल्या मुलीशी लग्न करेल, असं कळतंय. सूत्रांच्या मते, ‘स्वयंवर- मिका दी वोटी’मध्ये मिकाने स्टेजवर लग्न केलं नाही. केवळ मी माझी वधू निवडली, हे दाखवण्यासाठी त्याने आकांक्षाच्या गळ्यात वरमाला घातली. लग्न करण्यांआधी मिका आकांक्षाला आणखी समजून घेणार आहे. यानंतरच तो आकांक्षाशी लग्न करेल.

टॅग्स :मिका सिंगटेलिव्हिजनबॉलिवूड