Join us  

'चंद्रविलास' मालिकेतील अभिनेत्रीला ओळखलं का? 'स्वराज्य रक्षक संभाजी'मध्ये साकारली होती महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 5:40 PM

Abha bodas: या मालिकेतील शर्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण हे समोर आलं आहे.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. यात अनेक नवीन मालिका येऊ घातल्या आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे चंद्रविलास. झी मराठीवरील या नव्या मालिकेची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली असून ही एक भयपट मालिका आहे.  या मालिकेचे अनेक प्रोमो समोर आल्यामुळे दिवसेंदिवस या मालिकेविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. यामध्येच सध्या या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीची चर्चा होताना दिसते. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमधून ही मालिका मुलगी-वडील आणि चंद्रविलास वाड्यातील आत्मा यांच्यावर बेतल्याचं लक्षात येतं. विशेष म्हणजे मालिकेतील वडिलांची भूमिका साकारणाऱ्या सागर देशमुख यांना साऱ्यांनीच ओळखलं. मात्र, त्यातील मुलगी आणि आत्मा या भूमिका कोणी साकारल्या हा प्रश्न अनेकांना होता. यामध्येच आता या मालिकेतील शर्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण हे समोर आलं आहे.

'चंद्रविलास' मालिकेतील हॉरर लूकमधल्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?

कोण आहे मालिकेतील शर्वरी?

चंद्रविलास मालिकेत झळकलेली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून  आभा बोडस आहे. आभाने या पूर्वी अनेक मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. यापूर्वी तिने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत काम केलं होतं. या ऐतिहासिक मालिकेत तिने येसूबाईंची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ती चंद्रविलास या भयपट मालिकेत झळकणार आहे.

दरम्यान, आभाने नकुशी या मालिकेतही काम केलं आहे. जवळपास ५ वर्षांनंतर आभाने पुन्हा तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली आहे. आभाची बहीण मृगादेखील अभिनेत्री आहे. तिनेदेखील बालकलाकार म्हणून मराठी कलाविश्वात काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसागर देशमुखवैभव मांगले