आज मराठी चित्रपट सातासमुद्रापारच्या प्रेक्षकांनाही आकर्षित करीत आहेत. सध्या सुबोध भावेने साकारलेल्या टिळकांच्या अर्थात ‘लोकमान्य एक युगपुरुष’ चित्रपटाची भुरळ दुबईकरांना पडली आहे. मार्च महिन्याच्या २७ तारखेला दुबईच्या वाफी सिनेप्लेक्समध्ये ‘स्वराज्य’ चित्रपट दुबईत प्रदर्शित होणार आहे. दुबईत पहिल्यांदाच मराठी चित्रपट आणि तोही ‘लोकमान्य एक युगपुरुष’ दाखवला जाणार असल्याचे समाधान सुबोधने व्यक्त केले.
स्वराज्याची गर्जना दुबईत
By admin | Updated: March 18, 2015 23:03 IST