Join us  

अजय की आरिफ? होणाऱ्या बाळाच्या नावावरुन स्वरा भास्कर ट्रोल, फोटोवर निगेटिव्ह कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 3:16 PM

औरंगजेब नाव ठेवलं तर...स्वराच्या पोस्टवर कमेंट

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. लवकरच स्वरा आई होणार असून ती प्रेग्नंसीचा हा काळ एन्जॉय करत आहे. स्वराने वर्षाच्या सुरुवातीलाच समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमदसोबत लग्न केले. यानंतर तीनच महिन्यात तिने प्रेग्नंसीची घोषणा केली. मुस्लिम मुलाशी विवाह केल्याने आणि लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल्याने तिला ट्रोल केले गेले. आता होणााऱ्या बाळाचं नाव काय ठेवणार यावरुनही तिला ट्रोल करण्यात येतंय.

स्वराने बेबी बंपचा फोटो शेअर करत  काही महिन्यांपूर्वी प्रेग्नंसीची घोषणा केली होती.  आता तिने घरात पाळणा आणला असल्याचा फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोत त्या पाळण्यात मांजर बसलेली असल्याचं दिसतंय. नव्या येणाऱ्या पाहुण्यामुळे स्वरा आणि फहाद दोघंही खूप आनंदी आहेत. स्वराने फोटोखाली लिहिले,'बाळाच्या येण्याआधी आम्ही घरात पाळणा आणला आहे. बघा यावर सर्वात आधी कोणी कब्जा केला. पाळण्याचा पहिला मालक आता ते सोडायला तयार नाही. फहाद अहमद तुझं पहिलं बाळ.' सध्या तिने पोस्ट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर  व्हायरल होतोय.

स्वराच्या या फोटोवर तिच्या मित्रपरिवाराने शुभेच्छा दिल्या आहेत. तर नेटकऱ्यांनी मात्र ट्रोल केलं आहे. 'बाळाचं नाव अजय असणार की आरिफ खान?' अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने 'बाळाचं नाव औरंगजेब ठेवलं तर बवाल होईल' असं म्हटलं आहे. सध्या स्वरा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. स्वरा मात्र सध्या या ट्रोलिंगवर शांतच आहे.

टॅग्स :स्वरा भास्करबॉलिवूडप्रेग्नंसीट्रोल