Join us

स्वप्निलचा भाव वधारला

By admin | Updated: April 14, 2015 23:54 IST

बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि रोहित शेट्टीनिर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित नवाकोरा मराठी चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि रोहित शेट्टीनिर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित नवाकोरा मराठी चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ‘दुनियादारी’मधील स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी आणि ऊर्मिला कानेटकर अशी स्टारकास्ट असेल. दरम्यान, बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळीनेही त्याच्या मराठी चित्रपटासाठी स्वप्निलचाच आग्रह धरला असून, त्यांचे बोलणे झाल्याचे कळले आहे. परंतु स्वप्निलने यावर बोलायला सध्या नकार दिला असला तरी मराठीतील या चॉकलेट बॉयचा भाव वधारला हे मात्र खरे !