Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्निल जोशी झाला अरेस्ट

By admin | Updated: February 27, 2016 03:44 IST

स्वप्निलच्या चाहत्यांना हे ऐकून खरं तर धक्काच बसेल, पण हो, हे खरंय. स्वप्निल जोशी अरेस्ट झाला आहे, हे त्याने स्वत:च सांगितलंय. आता असे काय केलेय

स्वप्निलच्या चाहत्यांना हे ऐकून खरं तर धक्काच बसेल, पण हो, हे खरंय. स्वप्निल जोशी अरेस्ट झाला आहे, हे त्याने स्वत:च सांगितलंय. आता असे काय केलेय स्वप्निलने, की त्याला अरेस्ट करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याला अरेस्ट केले कोणी? तरुणींच्या दिल की धडकन असलेल्या या चॉकलेट बॉयला पोलिसांनी नाही तर प्रिया बापटनेच अरेस्ट केले आहे. स्वप्निलच्या गळ्याला हात लावून ‘यु आर अंडर अरेस्ट’ असे प्रियाने म्हटले आहे. आता स्वप्निलकडून असा काय गुन्हा झालाय, की त्याला प्रियाकडून अरेस्ट व्हावे लागलेय. एवढेच नाही तर यावर स्वप्निल पुढे म्हणतोय, ‘‘वी आर आॅल सेट टू कम टुगेदर फॉर द फर्स्ट टाइम.’’ याचा अर्थ स्वप्निल अरेस्ट झालाय ते फक्त प्रियासोबत काम करण्यासाठी. म्हणजे आता आपल्याला एका नव्या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री लवकरच पाहायला मिळणार यात शंका नाही.