हिंदी, मराठी चित्रपट व मालिकांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारा अभिनेता स्वप्नील जोशीच्या करिअरने आता एक वेगळे वळण घेतले आहे. ‘ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट अँड मिडिया सोल्यूशन्स प्रा. लि.' या कंपनीसोबत स्वप्नील जोशी कार्यरत झाला असून अभिनयासोबतच आता तो डिजिटल निर्मिर्ती क्षेत्रातही उतरला आहे. स्वप्नील मराठी मनोरंजन क्षेत्रातील सध्या आघाडीचा ब्रँड म्हणून आहे. नेटवर्क क्षेत्रात कार्यरत असलेल्या 'ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट अँड मिडिया सोल्यूशन्स प्रा. लि.' कंपनीने त्यांच्यासोबत दोन वर्षांचा करार केला आहे. या कंपनीसोबत स्वप्नीलचे टाय-अप झाले आहे.
स्वप्नील जोशी डिजिटल!!
By admin | Updated: December 5, 2014 08:56 IST