प्रत्येक नवीन वर्ष (New Year २०२५ ) एक नवीन आशा आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते. वर्ष २०२५ हे आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो हीच प्रत्येकाची इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक जण वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात (Temple) जाऊन प्रार्थना करतात. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे आयुष्यातील नवा अध्याय सुरू करण्यासारखा असतो. अभिनेता स्वप्नील जोशी याने नवीन वर्षाची सुरुवात भक्तिमय केली आहे.
स्वप्नील जोशी हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तो करिअर आणि वैयक्तिक लाइफचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. नुकतंच स्वप्नील जोशीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तो मंदिराबाहेर उभा असल्याचं दिसून येतोय. कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "तिरुपती बालाजीच्या आशीर्वादाने २०२५ ची सुरुवात! गोविंदा गोविंदा…गोविंदा. !!!!!". स्वप्नीलच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्स वर्षाव केलाय.
स्वप्नीलने २०२४ वर्षात बॅक टू बॅक चित्रपट करून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन केलं आहे. आता आगामी नवीन वर्षात स्वप्नील हा गुजराती चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण करतोय. आता तो गुजराती सिनेमामधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. "शुभचिंतक" अस या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात स्वप्नील सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय.