Join us  

Sushmita Sen And Lalit Modi Relationship: सुष्मिता सेनचं झालं ब्रेकअप?, ललित मोदींनी दिले हे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 1:07 PM

Sushmita Sen Relationship : ललित मोदींनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवरील प्रोफाइल बदलले आहे. तेव्हापासून सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचे ब्रेकअप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी (Lalit Modi) आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांनी त्यांचे फोटो शेअर करून प्रेम जाहीर केले होते. पुन्हा एकदा त्यांचे नाते चर्चेत आले आहे. यावेळी सुष्मिता आणि ललित मोदी प्रेमात नसून ब्रेकअपमुळे चर्चेत आहेत. ललित मोदींनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवरील प्रोफाइल बदलले आहे. तेव्हापासून सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचे ब्रेकअप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन महिन्यांपूर्वी ललित मोदींनी एक रोमँटिक फोटो शेअर केला होता ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली होती. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरबाबतही वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्या. यासोबतच ललित मोदींनी सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून सुष्मिता सेनसोबतच्या प्रेमाचा खुलासा केला होता आणि आपल्या बायोमध्ये सुष्मिताला माय लव्ह असं म्हटलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा ललित मोदींनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही हिंट्स दिल्या आहेत, ज्यात सांगितलं जात आहे की, काही नाही. त्यांच्या नात्यात काहीही चांगले चाललेलं नाही.

ललित मोदींनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवरील प्रोफाइल बदलले आहे. तेव्हापासून त्यांचे ब्रेकअप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ललित मोदींनी इन्स्टाग्रामवर बायो आणि फोटो बदलला असून, त्यानंतर दोघांचे नाते संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत. आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. याचे संकेतही ललित मोदींनी सोशल मीडियावरून दिले आहेत. ललित मोदींनी त्यांच्या बायोमधून सुष्मिता माय लव्ह हे नावही हटवले आहे. ललित मोदी यांनी बायोमध्ये लिहिले होते की, सुष्मिता सेनसोबत त्यांचे नवीन आयुष्य सुरू झाले. त्याने सुष्मिताला पार्टनर इन क्राइम असल्याचे सांगितले होते.

टॅग्स :सुश्मिता सेनललित मोदी