Sushmita Sen And Lalit Modi Funny Memes : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि ललित मोदी (Lalit Modi ) एकमेकांना डेट करत असल्याची पोस्ट व्हायरल झाली आणि सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. ललित मोदी यांनी कालसोशल मीडियावर काही फोटो शेअर करत सुष्मितासोबतच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली आहे. आता ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेमाचा नवा अध्याय सुरुवात झाल्यावर नेटकरी कसे शांत बसणार?
ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रिलेशनशिप ऑफिशिअल करताच, मीम्सकरांनी एकापेक्षा एक भन्नाट मीम्स शेअर केले आहेत. नेटकरी या प्रेम प्रकरणावरचे एक ना अनेक मजेशीर मीम्स शेअर करत आहेत. ट्विटर, इंस्टाग्रामवर लोकांनी धम्माल मीम्स शेअर केले आहेत. काही मीम्स इतके मजेशीर आहेत की, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
सुष्मिता गेल्या काही वर्षांपासून रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सहा महिन्यांआधी दोघांचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपनंतर काल अचानक सुष्मिता ललित मोदींना डेट करत असल्याचं समोर आला आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
काल ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेन सोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे, हे फोटो पोस्ट करताना त्यांनी सुष्मिताचा उल्लेख ‘बेटरहाफ’ असा केला. पण नंतर लगेच आमचं लग्न झालेलं नसून आम्ही एकमेकांना डेट करत असल्याचं स्पष्टीकरण दिलं.
ललित मोदींनी शेअर केलेल्या फोटोत सुष्मिता तिची डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे. यावरून कपलनं साखरपुडा केल्याचं मानलं जात आहे. सुष्मिता अद्याप या प्रेमप्रकरणावर काहीही बोललेली नाही. पण सध्या या प्रेमप्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.