सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची पत्नी लता (Lata) यांच्यावर काही दिवसांपूर्वी फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्याविरोधात एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण रजनीकांत यांचा 'कोचादियान' सिनेमावेळचं आहे. कर्नाटक हायकोर्टाने या प्रकरणी याटिका फेटाळली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा यावर प्रकाश टाकला आहे. तर लता रजनीकांत यांनी पहिल्यांदाच यावर मौन सोडत उत्तर दिलं आहे.
एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत लता रजनीकांत म्हणाल्या,'माझ्यासाठी ही खूपच अपमानाची गोष्ट आहे. सेलिब्रिटी असण्याची आम्हाला किंमत चुकवावी लागत आहे. जेव्हा तुम्ही लोकप्रिय असता तेव्हा प्रकरण भलेही छोटं का असेना त्याला मोठंच बनवलं जातं. कोणतीही फसवणूक झालेली नाही आणि माझं या पैशांशी काहीच देणंघेणं नाही.'
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदाराने असा आरोप केला की फिल्मच्या निर्मांत्यांपैकी कोणा एकाने पोस्ट प्रोडक्शनसाठी १० कोटी रुपये लावले होते. यावर लता यांची सही देखील होती. मात्र लता यांच्या प्रोडक्शन कंपनीकडून त्याला पैसेच मिळाले नाहीत. याप्रकरणी 2022 मध्ये कर्नाटक न्यायालयाने लता यांना दिलासा दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण पुन्हा उघडण्यास सांगितलं आहे.