Join us  

जुने दिवस आठवत रात्रभर ढसाढसा रडली सनी लिओनी, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 10:07 AM

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने आपले जुने दिवस आठवत आपल्या वेदना शब्दांच्या माध्यामातून सोशम मीडियात शेअर केल्या आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने आपले जुने दिवस आठवत आपल्या वेदना शब्दांच्या माध्यामातून सोशम मीडियात शेअर केल्या आहेत. या भावूक पोस्टवरुन तिला तिच्या आईची किती आठवण येतीये हे दिसतं. सध्या सनी लिओनी तिच्या 'करणजीत कौर' या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. 

करणजीत कौर एक ऑटोबायोग्राफी सिनेमा असून यात सनी लिओनी मुख्य भूमिका साकारणार आहे. करणजीत कौर हे सनी लिओनीचं खरं नाव आहे. पॉर्न इंडस्ट्रीत येण्याआधी तिला याच नावाने ओळखलं जायचं. या सिनेमाचं काम करत असताना सनी आपला भूतकाळ आठवून भावूक झाली. याचीच एक पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

सनीने लिहिले की, "आज माझं मन फार दुखी आहे. आज संपूर्ण रात्र मी रडले. माझा प्रत्येक अश्रू आठवण आणि पश्चातापाचा होता. तू आज माझ्याजवळ हवी होतीस. ते दिवस तर कधी परत येणार नाहीत. पण तुम्ही माझ्या हृदयात नेहमी राहणार!" #karenjitkaur guilty of doing it my way!!!'

सनी हे नाव तिला कसं पडलं याबाबत ती सांगते की, जेव्हा तुम्ही पेंटहाऊस पेट होता, तेव्हा जगभरातील रेडिओ कार्यक्रम, टीव्ही आणि मॅगझिनच्या शूटसाठी तुम्हाला पाठवलं जातं. मी त्यावेळी 19 वर्षांची होती आणि ते सगळं माझ्यासाठी नवीन होतं. दरम्यान मी एक मॅगझिनला मुलाखत देत होते. त्यांनी मला विचारले की, तुमचं नाव काय ठेवायचंय? सनी कसं राहील? मी हो म्हणाले. त्यावेळी मी जराही विचार केला नाही. सनी हे माझा भाऊ संदीप याचं घरचं नाव आहे. 

टॅग्स :सनी लिओनीबॉलिवूड