Join us

सनी लिओनी करतेय आगामी प्रोजेक्टची तयारी, सोशल मीडियावर दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 18:04 IST

Sunny Leone : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी केनेडी चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर आता ती लवकरच काहीतरी नवीन घेऊन असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जागतिक प्रेक्षकांकडून या चित्रपटाला सात मिनिटांचा स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाला. आता, सनी आणखी एक रोमांचक प्रकल्प सुरू करण्यासाठी सज्ज आहे आणि ज्यामुळे चाहते तिला पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत. 

सनी लिओनीने अलीकडेच इंस्टाग्रामवर स्वतःचे एक मोठी  स्क्रीप्ट वाचत असतानाचा फोटो शेअर केला. ज्यामुळे चाहत्यांना एक वेगळीच उत्सुकता लागली आहे. तिने पोस्टला कॅप्शन दिले, "ती एक मोठी स्क्रिप्ट आहे. खूप छान होणार!!!!!" तिच्या उल्लेखनीय कारकीर्दीसह सनी लिओनी तिच्या कामाने प्रेक्षकांची मन जिंकत असते. तिच्या इंस्टाग्राम पोस्टने सोशल मीडियावर आता आगामी प्रोजेक्टबद्दल चर्चा होताना दिसतात.

केनेडीमधील चार्लीची सनी लिओनीने साकारलेली भूमिका समीक्षकांना आवडली पण चाहते हा चित्रपट भारतातील थिएटरमध्ये रिलीज होण्याची वाट बघत आहेत. आता ती कोणत्या प्रोजेक्टची घोषणा करतेय, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :सनी लिओनी