Join us  

लेकाच्या लग्नात सनी देओलच्या मेहंदीचीच चर्चा, 'हातावर रेखाटलं प्रत्येक धर्माचं...'; Photos व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 9:13 AM

सनी देओलने मेहंदीतून दिला सर्वधर्मसमभाव संदेश

बॉलिवूडमध्ये पुन्हा लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. कलाकारच नाही तर स्टारकिड्सही लग्न करत आहेत. अभिनेता  सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल (Karan Deol) लग्नबंधनात अडकत आहे. करणच्या लग्नापूर्वीच्या फंक्शन्सला आता सुरुवात झाली आहे. तर करणचे आजोबा म्हणजेच हँडसम अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचेही आनंदात सहभागी होतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सनी देओलने हातावर काढलेल्या मेहंदीची चर्चा आहे.

करण देओल द्रिशा आचार्यसोबत (Drisha Acharya) लग्नबंधनात अडकत आहे. सोमवारपासूनच त्यांच्या प्रिवेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली. काल त्यांचा मेहंदी समारंभ पार पडला. या फंक्शन्सचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. करणच्या लग्नाची बीटाऊनमध्ये चर्चा आहे. बॉलिवूडमधील कोणी सेलिब्रिटी लग्नात उपस्थित राहणार का हे मात्र अजून समजलेलं नाही.

वडील सनी देओलनेही काढली मेहंदी 

अभिनेता सनी देओल लाडक्या लेकाच्या वेडिंग फंक्शन्समध्ये एंजॉय करत आहे. नुकताच त्याचा रोका सेरेमनी दरम्यान त्याचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला. आता त्याने हातावर काढलेल्या मेहंदीची चर्चा आहे. अभिनेत्याने कॅमेऱ्यासमोर हातावरची मेहंदी दाखवली. यात सर्वधर्मसमभाव दिसून येत आहे. त्याने प्रत्येक धर्माचे प्रतीक रेखाटले आहे. त्याची हा यूनिक मेहंदी पाहून एकच चर्चा रंगली आहे.

कोण आहे द्रिशा आचार्य?

सनी देओलची होणारी सून द्रिशा आचार्य फिल्म निर्माते बिमल रॉय यांची नात आहे. तिचे आईवडील सुमित आचार्य आणि चिमू आचार्य दुबईत असतात. द्रिशा आपल्या आईसोबत 1998 मध्ये मुंबईत शिफ्ट झाली. ती मिडल ईस्टमध्ये एक टॉप इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवते. आईसोबत ती नॅशनल प्रोग्रॅम मॅनेजर म्हणूनही काम करते.

टॅग्स :सनी देओललग्नकरण देओलव्हायरल फोटोज्