Join us  

सिनेमात हँडपंप उचलणाऱ्या सनी देओलला आवडतात टेडी बियर, लेकानेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 11:25 AM

करण जोहरचा लोकप्रिय शो 'कॉफी विद करण 8' मध्ये सनी देओल-बॉबी देओल या भावांनी हजेरी लावली.

'गदर' फेम अभिनेता सनी देओल (Sunny Deol) बॉलिवूडमधला 'माचो मॅन' म्हणून ओळखला जातो. २००१ साली आलेल्या 'गदर' मध्ये त्याने हँडपंप उचलला होता. तर नुकत्याच आलेल्या 'गदर 2'मध्ये त्याने बैलगाडीचं चाक उचललं. अशा अॅक्शन भूमिका साकारणाऱ्या सनी देओलला खऱ्या आयुष्यात टेडी बिअर आवडतात. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरंय याचा खुलासा सनीचा मुलगा करण देओलनेच (Karan Deol) केला आहे. 

करण जोहरचा लोकप्रिय शो 'कॉफी विद करण 8' मध्ये सनी देओल-बॉबी देओल या भावांनी हजेरी लावली. सध्या देओल बंधूंची बॉलिवूडमध्ये खूपच चर्चा आहे. या शोमध्ये देओल कुटुंबातील इतर सदस्यांनी सनी आणि बॉबीबद्दल अनेक खुलासे केले. सनी देओलचा मुलगा करणचा एक व्हिडिओ शोमध्ये दाखवण्यात आला. यामध्ये तो म्हणतो,'बाबांना टेडी बियरची खूप हौस आहे. एकदा आमच्याकडे टेडी बियरचं कलेक्शन पाहून एकाने मला विचारलं हे तुझं आहे का?  मी म्हणालो नाही. तर तो म्हणाला मग तुझ्या आईचं असेल. मी म्हणालो नाही. तेव्हा त्यालाही प्रश्नच पडला की मग हे कलेक्शन कोणाचं असेल?  तेव्हा मी त्याला म्हणालो, हे माझ्या बाबांचं आहे. माझं उत्तर ऐकताच तोही नि:शब्दच झाला.'

सिनेमात हँडपंप उचलणाऱ्या सनी देओलला चक्क टेडी बियर आवडतात हे ऐकून करण जोहरही शॉक झाला. करणने सनीला याबद्दल विचारलं तेव्हा सनी म्हणाला,'मला टेडी बियर खूपच क्यूट वाटतात. मी माझ्या कारमध्येही टेडी बियर ठेवलं आहे आणि कधीकधी माझ्या खिशातही छोटं टेडी बियर असतं.जेव्हा केव्हा मला  एखादं चांगलं टेडी बियर दिसतं मला ते खेरदी करण्याचा मोह होतो.'

सनी देओल आणि बॉबी देओलचा हा एपिसोड हॉटस्टारवर प्रसारित झाला आहे. हे दोघं भाऊ १८ वर्षांपूर्वी 'कॉफी विद करण'च्या पहिल्या सिझनमध्ये सहभागी झाले होते. यानंतर त्यांनी थेट आठव्या सिझनमध्ये हजेरी लावली आहे. 

टॅग्स :सनी देओलकरण देओलबॉबी देओलकरण जोहर