Join us  

'जावईबापूं'नी पाकिस्तानला धुतलं; राहुलच्या शतकावर 'सासरेबुवा' सुनिल शेट्टींची खुणेनेच प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:09 PM

Lokmat Most Stylish Awards 2023 : सुनील शेट्टीचा 'लोकमत मोस्ट स्टायलिश' पुरस्काराने झाला गौरव

Lokmat Most Stylish Awards 2023 मंगळवारी थाटामाटात पार पडला. मुंबईत बॉलिवूडच्या बड्या तारेतारकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. सोहळ्यासाठी मोठमोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात बॉलिवूडचा 'अन्ना' सुनील शेट्टी याने आपल्या फिटनेसच्या जोरावर पुरस्कार सोहळ्यात साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. त्याला Lokmat Most Stylish Timeless Icon म्हणजेच चिरतरूण व्यक्तिमत्व या पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्याचे साऱ्यांनीच अभिनंदन केले. पण त्यासोबतच, या सोहळ्यासाठी आलेला असताना, त्याला त्याचा जावई केएल राहुलच्या शतकाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सुनील शेट्टीची रिअँक्शन पाहण्यासारखी होती.

राहुलबद्दलच्या प्रश्नावर सुनील शेट्टीने काय केले?

भारतीय संघासाठी आशिया चषकानंतर एक मोठी परीक्षा वाट पाहत आहे. या परीक्षेसाठी भारतीय संघ कसून तयारी करताना दिसतोय. आशिया चषक ही या विश्वचषकाची रंगीत तालीम असल्याचे मानले जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघांना धूळ चारत भारताने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पाकिस्तान विरूद्ध भारतीय संघाने ३५० पार मजल मारली. सहा महिन्यांनी क्रिकेट पदार्पण करणाऱ्या केएल राहुलने दमदार शतक ठोकले. या शतकावर तुमची प्रतिक्रिया काय? असे विचारल्यावर सुनील शेट्टीने काहीही न बोलता, बोटं दुमडून Fingers Crossed अशी अँक्शन केली. जे चाललंय ते छान चाललंय, बोलून उगाच त्याच्यावरचं दडपण वाढवू नका, अशा आशयची प्रतिक्रियाही त्याने दिली. पाहा व्हिडीओ-

टॅग्स :लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस 2023सुनील शेट्टीलोकेश राहुलएशिया कप 2023