ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - बॉलिवुडचा दबंग म्हणजेच सलमान खानचा 'सुल्तान' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या फिल्मसाठी चित्रपटगृहात होणारी गर्दीच सर्व काही सांगून जात आहे. चित्रपटाने अवघ्या चार दिवसाताच दोनशे कोटींचा टप्पा पार केला आहे.
प्रदर्शनानंतर चार दिवसातच दोनशे कोटींची कमाई करुन अली अब्बास झफरच्या चित्रपटाने नवा इतिहास रचला होता. सुल्तानची आतापर्यंतची जगभरातील एकत्र कमाई २०६ कोटी रुपये आहे. भारतात या चित्रपटाने आतापर्यंत १४८ कोटी कमावले असून, परदेशात ८.६० मिलियन डॉलरचा व्यवसाय केला आहे.
रविवारचे आकडे आल्यानंतर या चित्रपटाच्या उत्पन्नात आणखीं वाढ होईल. सलमान आणि अनुष्का शर्माची मुख्य भूमिका असलेला सुल्तान पैसावसूल मसालापट चित्रपट आहे. सलमानच्या करीयरमधील हा सर्वाधिक कमाई करुन देणारा ब्लॉगबस्टर सिनेमा ठरणार आहे.