Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुहाना खानचे लेटेस्ट फोटो होतायेत व्हायरल, ग्लॅमरस अंदाजात दिसली किंग खानची लेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 12:58 IST

शाहरूख खानची लेक सुहाना खान पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरूख खानची लेक सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत येत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुहाना खूप ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. या फोटोंमध्ये सुहाना काळ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसते आहे. तिने या पोस्टमध्ये अभिनेता जेम्स डीनचाही उल्लेख केला आहे.

सुहाना खानने पोस्ट शेअर करत लिहिले की, मी रुममध्ये आली, तुला माहिती आहे माझे डोळे रागाने भरले आहेत जेम्स डीनसारखे.

 

सुहाना खानचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सुहानाचा या फोटोतील अंदाज बॉलिवूडमधील अभिनेत्रींना टक्कर देतो.

मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती. कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इच्छा होती. सुहाना अमेरिकेत तिचे शिक्षण पूर्ण करते आहे. लॉकडाऊनच्या आधी ती मुंबईत घरी आली आहे.सध्या ती कुटुंबासोबत वेळ व्यतित करते आहे.

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान