Join us
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श ! अखेरच शाहरुख खानच्या मुलीचा बॉलिवूड पदार्पणाचा मूहुर्त ठरला, या सिनेमातून करणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 17:12 IST

गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या डेब्यूची चर्चा आहे. लंडनमध्ये अभिनयाचे शिक्षण घेत असलेल्या सुहानाने अनेक नाटकांमध्ये तिथं काम केले आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सच्या डेब्यूची चर्चा आहे. सारा अली खान, अनन्या पांडेनंतर शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये एंट्री घेण्यास सज्ज झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या डेब्यूची चर्चा आहे. लंडनमध्ये अभिनयाचे शिक्षण घेत असलेल्या सुहानाने अनेक नाटकांमध्ये तिथं काम केले आहे.  आजतकच्या रिपोर्टनुसार शाहरुखने एक मुलाखती दरम्याम सुहाना लवकरच सिनेमामध्ये काम करणार असल्याचे स्पष्ट केले.   

सुहाना खान एका शॉर्ट फिल्ममध्ये काम करणार आहे. या शॉर्ट फिल्मचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोस्टर सुहानाच्या फोटोसोबत The Grey Part Of Blue असे लिहिले दिसते. 

 गतवर्षी तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या. सुहाना सध्या शिकतेय. 

मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती.  कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते. आता भव्यदिव्य असे काही हवे असेल तर भन्साळींसारख्या लार्जर दॅन लाईफ दिग्दर्शकाशिवाय बॉलिवूडमध्ये अन्य दुसरा पर्याय नाही. कारण भन्साळी त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यामुळे सुहानाच्या लॉन्चिंगसाठी शाहरूखने भन्साळींच्या नावाला पसंती दिली, असे म्हटले गेले होते. स्वत: सुहानाला पारंपरिक लव्हस्टोरीत इंटरेस्ट नाही. आपण काहीतरी वेगळे करावे. आपला डेब्यू काहीतरी वेगळा आणि यादगार व्हावा, अशी तिचीही इच्छा आहे. आता तिची ही इच्छा भन्साळी पूर्ण करतात की आणखी कुणी, ते पाहूच.

 

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान