Join us

वयाच्या 17व्या वर्षी गमावला पाय,तरीही मानली नाही हार,कृत्रिम पायाच्या आधारे 'ही' अभिनेत्री आजही करते उत्तम डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 09:00 IST

९० च्या दशकापासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.आत्तापर्यंत  'बहुरानियां', 'चंद्रकांता', 'कभी इधर कभी उधर', 'चश्मे बद्दूर', 'अंतराल', 'कैसे कहूं', 'कहीं किसी रोज', 'क्योंकि सास भी कभी बहू थी, 'कस्तूरी', 'अदालत' यासारख्या मालिकेत झळकल्या आहेत.

सुधा चंद्रन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. सुधा चंद्रन तिच्या नकारात्मक व्यक्तिरेखांसाठी ओळखल्या जातात. 'कहीं किसी रोज' या मालिकेतील रमोला सिकंद, 'नागिन' या मालिकेतील यामिनीच्या भूमिकेतून त्यांनी रसिकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुधा चंद्रन यांनी टीव्हीशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे. सुधा एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्कृष्ट शास्त्रीय नृत्यांगना देखील आहेत.

अलीकडेच विमानतळावरून सुधा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, व्हिडीओमध्ये विमानतळावर होणाऱ्या गैरसोयींबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करताना दिसल्या होत्या. विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान त्यांना प्रोस्थेटिक्स म्हणजेच कृत्रिम पाय काढण्यास सांगितले जाते, त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. 

सुधा जेव्हा 17 वर्षांच्या होत्या.तेव्हा एका अपघातात त्यांना जबर दुखापत झाली होती. हा अपघात इतका भीषण होता की, त्यांना त्यांचा उजवा पाय कापावा लागला. यानंतर त्यांचे आयुष्य फार बदलले होते. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. सुधा यांना नृत्याची आवड असल्याने पुन्हा कधीही डान्स करु शकणार नाही. अशी भीती त्यांना सतावत होती. मात्र यावरही त्यांनी मात केली.  कृत्रिम पायाच्या मदतीने आणि फिजिओथेरपीच्या मदतीने  ३ वर्षात त्यांनी चालायला सुरुवात केली होती. इतकंच काय तर कृत्रिम पाय असला तरी त्या उत्तम डान्स करु शकतात.

सिनेमा आणि नृत्याच्या दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सुधा ९० च्या दशकापासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. सुधा आत्तापर्यंत  'बहुरानियां', 'चंद्रकांता', 'कभी इधर कभी उधर', 'चश्मे बद्दूर', 'अंतराल', 'कैसे कहूं', 'कहीं किसी रोज', 'क्योंकि सास भी कभी बहू थी, 'कस्तूरी', 'अदालत' यासारख्या मालिकेत झळकल्या आहेत. मालिकाच नाही तर सिनेमातही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :सुधा चंद्रन