Join us
Daily Top 2Weekly Top 5

Subodh Bhave: सुबोध भावेनं धाकट्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली स्पेशल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 11:19 IST

Subodh Bhave : सुबोध भावेला दोन मुलं आहेत. एकाचं नाव कान्हा आणि धाकट्या मुलाचं नाव मल्हार आहे. आज मल्हारचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने अभिनेत्याने स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

मालिकांपासून चित्रपटांपर्यंत अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत विविध क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे (Subodh Bhave). सुबोध उत्तम अभिनेता तर आहेत पण अभिनेता म्हणून सिद्ध केल्यानंतर तो कथाकार झाला, दिग्दर्शक झाला. नुकताच सुबोध ताज या हिंदी वेबसीरिजमध्ये बिरबलच्या भूमिकेत पाहायला मिळाला. सुबोध सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर त्याच्या धाकट्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.

सुबोध भावेला दोन मुलं आहेत. एकाचं नाव कान्हा आणि धाकट्या मुलाचं नाव मल्हार आहे. आज मल्हारचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने अभिनेत्याने स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याचे फोटो शेअर करत लिहिले की, मल्हार रागाच्या विविध छटा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मल्हार आणि खूप प्रेम. या पोस्टवर सुबोधचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

मल्हार सुबोध भावे हा देखील बालकलाकार आहे. त्याने मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. २०१७ साली आलेल्या फुगे सिनेमात एका छोट्या सीनमध्ये मल्हारची झलक दिसली होती. त्यानंतर त्याने तुला पाहते रे या मालिकेत छोट्या जयदीपची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचं कौतुकदेखील झाले होते.

टॅग्स :सुबोध भावे