Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुबोध भावे नवीन भूमिकेत

By admin | Updated: July 16, 2017 02:22 IST

नकुतेच प्रदर्शित झालेले ती सध्या काय करतेय, ‘भेटली तू पुन्हा’, सारख्या भन्नाट टायटलमुळे हे सिनेमे प्रदर्शनापूर्वीच रसिकांमध्ये तुफान गाजले.

नकुतेच प्रदर्शित झालेले ती सध्या काय करतेय, ‘भेटली तू पुन्हा’, सारख्या भन्नाट टायटलमुळे हे सिनेमे प्रदर्शनापूर्वीच रसिकांमध्ये तुफान गाजले. आता पुन्हा एकदा अशाच धाटणीचा एक सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘मितवा’ ‘लाल इश्क’ ‘फुगे’ सिनेमानंतर दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे पुन्हा एक नवीन मराठी सिनेमा आणण्यासाठी सज्ज आहेत. ‘तुला कळणार नाही’ हा आगामी मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे ‘तुला कळणार नाही’ या सिनेमात अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर सिनेमाच्या नावाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. यावेळी सिनेमाची निर्मिती अभिनेता स्वप्निल जोशी याने केली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वप्ना वाघमारे आणि स्वप्निल जोशी यांची घट्ट मैत्री असल्याची बाब अधोरेखित झाले. स्वप्ना वाघमारेच्या सिनेमात स्वप्निल जोशीने नेहमी स्वप्नाला साथ दिल्याचे पाहायला मिळाल्या. त्यामुळे ‘तुला कळणार नाही’ सिनेमासाठी स्वप्निलने पुढाकर घेतला आहे.