Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पोलिसांच्या 'त्या' भन्नाट ट्विटला अभिनेता सुबोध भावेने दिली दिलखुलास दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 15:37 IST

सध्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेले हे ट्विट चांगलेच व्हायरल होते आहे.

सध्या लॉकडाऊनमध्ये मुंबई पोलिस रस्त्यांवर आणि सोशल मीडियावर दोन्ही ठिकाणी सक्रिय झाले आहेत. कोरोना दरम्यान  केलेल्या भन्नाट ट्विटमुळे महाराष्ट्र पोलिस याआधी चर्चेत आले होते. पुन्हा एकदा अशाच एका ट्विटमुळे महाराष्ट्र पोलिस चर्चेत आले आहेत. लॉकडाऊनमध्ये ही वेगवेगळ्या मार्गाने सायबर क्राईम घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी एक भन्नाट  ट्विट केलं आहे.

नागरिकांना सर्तक करण्यासाठी पोलिसांनी कट्यार काळजात घुसली सिनेमाच्या पोस्टरची मदत घेतली आहेत. पोलिसांनी ट्विट करत म्हटले आहे, सायबर गुन्ह्याची ‘कट्यार’ तुमच्या अकाऊंटमध्ये घुसू देऊ नका!  जेव्हा तुम्हाला कोणी - ‘वेगवेगळ्या अकाउंट चे पासवर्ड वेगळे आहेत ना?’ असं विचारतं, तेव्हा अभिमानाने ‘खाँ साहेबांसारखं’ उत्तर द्या. बेशक हमारे पासवर्ड का कोई सानी नहीं. बहुत ही बुलंद और बेमिसाल हैं हमारा पासवर्ड,असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

अभिनेता सुबोध भावेने पोलिसांच्या ट्विटला रिट्विट केलं आहे आणि त्यांच्या कामाचे कौतुकदेखील केले आहे. सुबोध लिहितो, वाह वाह महाराष्ट्र पोलीस… तुमच्या कल्पना निरागस सुरासारख्या आहेत… आपल्या सुरक्षित हातांमध्ये महाराष्ट्राचं मनमंदिर तेजाने उजळून निघू दे”, सध्या दोघांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते आहे. 

टॅग्स :सुबोध भावे