Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुबोध बनला लेखक

By admin | Updated: October 31, 2016 02:28 IST

अभिनेता सुबोध भावेने नेहमीच चित्रपटात विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

अभिनेता सुबोध भावेने नेहमीच चित्रपटात विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. सुबोधने त्याच्या चार चित्रपटांतील प्रवासावर एक पुस्तक लिहिले आहे. लवकरच या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याचे सुबोधने सांगितले. या पुस्तकाविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सुबोध सांगतो, ‘‘घे छंद या नावाचे पुस्तक मी नुकतेच लिहिले आहे. ते सर्वांसाठी लवकरच उपलब्ध होईल. खरे तर मी काही लेखक नाही. पण मला माझ्या शाळेतील एका जुन्या मित्राने हे पुस्तक लिहिण्यासाठी भाग पाडले.’’ त्याच्या आग्रहाखातरच मी पुस्तक लिहायला घेतले होते. माझ्या आयुष्यातील कट्यार काळजात घुसली हे नाटक ते कट्यार काळजात घुसली हा चित्रपट या दरम्यानचा प्रवास पुस्तकात मांडण्यात आला आहे. कलाकार म्हणून मी यादरम्यान कसा घडलो, काय शिकलो, काय अनुभवलो या सर्वच गोष्टी मी उतरविल्या आहेत. सप्टेंबरमध्ये मी हे पुस्तक लिहायला घेतले होते. आता प्रेक्षकांसाठी ते लवकरच प्रकाशित होईल.