आलिया भट्ट हिने ठरवले आहे की, ती आॅन स्टेज स्टंट्सपासून दूरच राहणार आहे. जानेवारीत होणाऱ्या अॅवॉर्ड फं क्शनमध्ये डान्स सादरीकरणासाठी तिने आयोजकांना सांगितले आहे की, ‘ती कुठलेही स्टंट करणार नाही.’ काही दिवसांपूर्वीच ती एका अपघातामुळे खूप त्रस्त झाली होती. तिने सोहळ्यात डान्स करण्यास सहमती दाखवली असून, कोणतेही डेअरिंग स्टंट्स करण्यास नकार दिला आहे. आलियाच्या परफॉर्मन्ससाठी दोन-तीन गाणी घेऊन एक मेलडी तयार केली आहे. तिने रिहर्सलला सुरुवात केली आहे.
स्टंटपासून आलिया दूरच...
By admin | Updated: December 28, 2015 03:15 IST