Join us
Daily Top 2Weekly Top 5

इलियाना जॅकी चॅन बरोबर करणार स्टंट

By admin | Updated: October 5, 2015 21:13 IST

अभिनेत्री इलियाना डीक्रुजचा बॉलीवूडचा प्रवास म्हणावा तितका सुखकर नक्कीच नाही. तिला मिळालेल्या ‘बर्फी’ चित्रपटातील उत्तम अभिनयामुळे ती रसिकांच्या लक्षात राहिली

 ऑनलाइन लोकमत

मुंबई , दि. ५ - अभिनेत्री इलियाना डीक्रुजचा बॉलीवूडचा प्रवास म्हणावा तितका सुखकर नक्कीच नाही. तिला मिळालेल्या ‘बर्फी’ चित्रपटातील उत्तम अभिनयामुळे ती रसिकांच्या लक्षात राहिली. यानंतर या नाजूक अभिनेत्रीने ‘मै तेरा हीरो’, ‘हॅप्पी एंडिंग’ यांसारख्या चित्रपटांतही काम केले. परंतु या चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. आता इलियानाला जॅकी चॅनच्या ‘कुंग फु योगा’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात इलियाना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. यात तिच्या अभिनयाला वाव मिळणार असून लहानसहान स्टंट करायलाही मिळणार आहेत. सोनू सुदचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटातील इलियानाचा रोल आधी कतरिना कैफला ऑफर झाला होता, परंतु तारखांच्या अभावी तिने तो सोडल्याचे समजते.