Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींनी शिकावे मार्शल आर्ट

By admin | Updated: August 7, 2014 23:01 IST

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या मते देशात सर्वच विद्यार्थिनींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण द्यायला हवे.

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या मते देशात सर्वच विद्यार्थिनींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण द्यायला हवे. यशराज बॅनरची निर्मिती असलेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटात राणी एका पोलीस अधिका:याच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 22 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ही भूमिका निभावण्यासाठी राणीने मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती म्हणाली की, ‘स्वत:चे संरक्षण करण्यासाठी देशात सर्वच विद्यार्थिनींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण द्यायला हवे. प्रत्येक स्तरावर नारी शक्तीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणो गरजेचे आहे. नारी शक्तीचे रूप असलेल्या विद्यार्थिनींना स्वत:च्या सन्मानाचे संरक्षण करण्यासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण द्यायला हवे.’