Join us

दुबईला जाण्यापूर्वी श्रीदेवी आजारी होत्या, मैत्रिणीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 21:50 IST

श्रीदेवी यांच्या जवळच्या मैत्रिणींने हा हा खुलासा केला आहे. 

मुंबई - शासकिय इतमात बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूप्रकरणी आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. श्रीदेवी यांच्या जवळची  मैत्रिण पिंकी रेड्डी यांनी हा खुलासा केला आहे. 

सोमवारी आलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला. दुबईत कौटुंबिक सोहळ्यात श्रीदेवीने उत्साहाने भाग घेतला होता. भाच्याच्या लग्नात श्रीदेवी बेभान होवून नाचल्या होत्या, साजशृंगार केला त्या आज आपल्यात नाहीये ही कल्पनाच अनेकांना पटत नाही. मात्र दुबईत जाण्याआधी त्यांची तब्येत बरी नसल्याची माहिती पिंकी रेड्डी यांनी  मिड-डेला दिली आहे. 

मिड-डेच्या बातमीनुसार पिंकी रेड्डी श्रीदेवीच्या बालपणीच्या मैत्रिण आहेत.  दुबईमध्ये भाचा मोहित मारवाहच्या लग्नाला जाण्याआधी श्रीदेवीचे पिंकी रेड्डींशी बोलणे झाले होते. यावेळी श्रीदेवी यांनी आपल्याला आजाराविषयी सांगितल्याचे पिंकींनी म्हटले आहे. पिंकी म्हणाल्या, दुबईला जाण्याआधी माझे श्रीदेवींशी बोलणे झाले होते. त्यांना ताप होता आणि त्या अँटी बायोटिक्स घेत होत्या. त्या खूप थकल्यासारखे वाटत आहे, मात्र आपल्याला लग्नाला जावेच लागेल असे त्या म्हणाल्याचे पिंकी म्हणाल्या. 

पिंकी रेड्डींनी श्रीदेवीच्या मृत्यूबाबत सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांवर नाराजी व्यक्त केली आहे. श्रीदेवीच्या मृत्यूची खिल्ली उडवली जात असल्याने वाईट वाटतेय असल्याच्या त्या म्हणाल्या. 

टॅग्स :श्रीदेवी