Join us

स्पृहा जोशीचा हा फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात, फॅन्स म्हणाले ड्रिम गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 07:15 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक म्हणजे स्पृहा जोशी. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक म्हणजे स्पृहा जोशी. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली.

याशिवाय छोट्या पडद्यावरील मालिकांमधून तिने तिच्या अभिनयाची जादू पसरवली आहे. स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. नुकताच स्पृहाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत स्पृहा गाऊन परिधान केला आहे. स्पृहाचा हा अंदाज तिच्या फॅन्सना खूपच भावला आहे. 

स्पृहा अभिनयासोबतच एक चांगली लेखिका आणि उत्तम कवियत्री आहे. छोट्या पडद्यावरील बच्चे कंपनीच्या रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन करून तिने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मने जिंकली आहेत.

अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, उंच माझा झोका यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली. या सगळ्याच मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या.

या मालिकेतील तिच्या भूमिकांची नाव देखील आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहेत. तसेच समुद्र, डोण्ट वरी बी हॅपी यांसारख्या नाटकातून तिने तिची अभिनयक्षमता दाखवून दिली. पैसा पैसा, मोरया, जाऊ द्या ना बाळासाहेब, बायोस्कोप, अ पेइंग गेस्ट यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. 

टॅग्स :स्पृहा जोशी