Join us  

जपानमधील भूकंपाच्या आधी सुखरुप भारतात पोहोचला ज्युनिअर एनटीआर, ट्वीट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 10:16 AM

जपानमधील भूकंपाच्या परिस्थितीत अडकणार होता ज्युनिअर एनटीआर

Jr NTR Japan Earthquake:  नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जपान देश भूकंपाच्या धक्क्याने हादरला. काल १ जानेवारी रोजी जपानमध्ये ९० मिनिटांत रिश्टल स्केलवर ४.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. तसंच थोडेथोडके नाही तर तब्बल २१ वेळा हा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता 7.6 रिश्टल स्केल इतकी मोजली गेली. जपानमध्ये ही परिस्थिती उद्भवण्याच्या काही वेळ आधीच साऊथ सुपरस्टार ज्यूनिअर एनटीआर (Jr NTR) जपानमधून भारताकडे रवाना झाला होता. यानंतर जपानमध्ये झालेल्या भूकंपाने तोही शॉक झाला आहे.

ज्यूनिअर एनटीआरने काल रात्री ट्वीट करत माहिती दिली की, 'मी आजच जपानमधून परत आलो आहे. तेथील भूकंपाची बातमी ऐकून मी  हादरलो आहे. मागचा संपूर्ण आठवडा मी जपानमध्येच होतो. भूकंपामुळे नुकसान झालेल्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो. जे लोक यातून सुखरुप बाहेर आले त्यांच्यासाठी मी आनंदी आहे आणि लवकरच त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी अशी आशा करतो. stay strong जपान!'

सध्या जपानमध्ये परिस्थिती भीषण आहे.भूकंपामुळे समुद्रात उंच लाटा उसळल्यानंतर देशाच्या उत्तर-पश्चिम किनारपट्टी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. ज्यूनिअर एनटीआर यातून थोडक्यात वाचला असल्याने चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र अभिनेत्याला ही बातमी कळल्यानंतर चांगलाच धक्का बसला असल्याचं त्याने ट्वीटमधून स्पष्ट केलं आहे.

ज्यूनिअर एनटीआरने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आगामी 'देवरा' या सिनेमाबाबत अपडेट शेअर केलं. फिल्मचं टीजर आणि रिलीज डेटची त्याने घोषणा केली. याशिवाय त्याचा 'एनटीआर 30' हा सिनेमाही येणार आहे. यामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असणार आहे. तसंच तो बॉलिवूडमध्ये 'वॉर 2' सिनेमातही झळकणार आहे.

टॅग्स :ज्युनिअर एनटीआरजपानभूकंपनैसर्गिक आपत्तीTollywood