Join us

१४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडलेली रश्मिका मंदाना, साखरपुडाही झाला होता; पण, लग्न मोडलं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 10:55 IST

अभिनेता विजय देवरकोंडासोबत अफेअर सुरु असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. पण विजय रश्मिका पहिलं प्रेम नाही. तुम्हाला माहितीए का रश्मिका फक्त १९ व्या वर्षी एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती.

'पुष्पा' फेम श्रीवल्ली म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना अल्पावधीतच महाराष्ट्राची क्रश बनली. तिच्या क्युट अंदाजाने प्रेक्षकांचे मन जिंकले. रश्मिका साऊथमधील आघाडीची अभिनेत्री आहे. अल्लु अर्जुनसोबतचा तिचा 'पुष्पा' सिनेमा सुपरहिट ठरला. नॅशनल क्रश असलेल्या रश्मिका मंदानाने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. विजय देवरकोंडा, अल्लु अर्जुन, रामचरण या सुपरस्टार्स सोबत तिची जोडी जमली आहे. साऊथ इंडस्ट्रीशिवाय आता बॉलिवूडमध्येही तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग तयार झाली आहे.

रश्मिकाने 'गुडबाय' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सिनेमात तिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. तर आता रश्मिका रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल' या सिनेमात झळकणार आहे.

रश्मिकाची प्रोफेशनल लाईफ तर आपण बघतच आहोत पण तिचं खाजगी आयुष्यही नेहमी चर्चेत राहिलं आहे. सध्या तिचं अभिनेता विजय देवरकोंडासोबत अफेअर सुरु असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. पण विजय रश्मिका पहिलं प्रेम नाही. तुम्हाला माहितीए का रश्मिका फक्त १९ व्या वर्षी एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती. दोघांचा साखरपुडाही झाला होता.

होय. रश्मिकाने 2017 रोजी वयाच्या १९ व्या वर्षी साखरपुडा केला होता. साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता रक्षित शेट्टीवर तिचा जीव जडला होता. रश्मिका रक्षितहून १२ वर्षांनी लहान होती. काही कारणाने त्यांचं नातं तुटलं नाही लग्नापर्यंत पोहोचलंच नाही.रश्मिकाने 'किरिक पार्टी' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या सिनेमात रक्षित तिचा कोस्टार होता. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र नशिबाला हे नातं मंजूर नव्हतं. साखरपुड्यानंतर १४ महिन्यांनंतर रश्मिका आणि रक्षितच्या वाटा वेगळ्या झाल्या.

वेगळे झाल्यानंतर आजपर्यंत दोघांनीही यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. कामामुळे दोघांमध्ये वाद होत होते. रश्मिकाला तिचे करिअर करायचे होते. कामाबाबतीत त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. असंही म्हणतात की दोघांचं कुटुंबही याला कारण ठरलं. रश्मिका आता प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात पुढे गेली आहे . सध्या ती तिच्या करिअरवर लक्ष देत आहे.

टॅग्स :रश्मिका मंदाना