Join us

कटप्पाने बाहुबलीला मारलं नसतं तर काय झालं असतं? राणा दग्गुबतीने स्टोरीच सांगितली, म्हणाला...

By कोमल खांबे | Updated: July 17, 2025 17:49 IST

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. कटप्पाने बाहुबलीला मारायला नको होतं, अशा प्रतिक्रिया येत होत्या. पण, जर तसं झालं नसतं तर काय झालं असतं? याचं उत्तर आता बाहुबलीतील भल्लालदेवने दिलं आहे. 

एस एस राजामौलींचा 'बाहुबली' हा सिनेमा सुपरहिट ठरला. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. कटप्पा बाहुबलीच्या पाठीत खंजीर खुपसतो असा या सिनेमाचा शेवट होता. सिनेमा संपल्यानंतर त्याचा सीक्वल येईपर्यंत कटप्पाने बाहुबलीला का मारलं? हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. कटप्पाने बाहुबलीला मारायला नको होतं, अशा प्रतिक्रिया येत होत्या. पण, जर तसं झालं नसतं तर काय झालं असतं? याचं उत्तर आता बाहुबलीतील भल्लालदेवने दिलं आहे. 

'बाहुबली' सिनेमात प्रभास, अनुष्का शेट्टी, राम्या क्रिष्णन यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर राणा दग्गुबतीने भल्लादेव ही निगेटिव्ह भूमिका साकारली होती. अभिनेता सत्यराज कटप्पाच्या भूमिकेत होते. एका चाहत्याने राणा दग्गुबतीला X वर "जर कटप्पाने बाहुबलीला मारलं नसतं तर?" असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नावर भल्लालदेवने मजेशीर उत्तर दिलं. या प्रश्नाचं उत्तर देताना भल्लादेव म्हणाला, "तर मी त्याला मारून टाकलं असतं". 

'बाहुबली' सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड मोडले होते. जगभरात या सिनेमाने जवळपास २४०० कोटींचा बिजनेस केला. त्यानंतर २०१७ मध्ये 'बाहुबली २' प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमानेही जगात तब्बल १८१० कोटींचा गल्ला जमवला होता. 

टॅग्स :बाहुबलीप्रभासराणा दग्गुबती