Join us  

३५ वर्षीय अभिनेत्रीने जीवन संपवलं, शेवटची पोस्ट होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 1:49 PM

ही बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

साऊथ इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी समोर येत आहे. मल्याळम टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री रंजूषा मेनन तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. अभिनेत्री तिरुअनंतपुरममधील तिच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. ३० ऑक्टोबरला सकाळी ही दु:खद घटना घडली आहे.  

रंजूषा साऊथ इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत. त्या अखेरच्या आनंदरागममध्ये मुख्य भूमिकेत दिसला होत्या. सिटकॉम वरण डॉक्टरनूमध्ये त्यांनी विनोदी भूमिका साकारली होती. एंटे माथावू आणि मिसेस हिटलर यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांनी त्यांनी लक्ष वेधून घेतले.

टीव्ही सीरियल्सशिवाय, त्या सेलिब्रिटी कुकरी शो 'सेलिब्रिटी किचन मॅजिक' मध्ये स्पर्धक म्हणून दिसल्या होत्या. सिटी ऑफ गॉड आणि मेरीकुंडोरू कुंजाडू या चित्रपटांमध्येही त्या झळकल्या होत्या. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय होती. त्या त्यांच्या सहकलाकारांसोबतचे व्हिडिओ पोस्ट करायच्या.  29 ऑक्टोबर रोजी त्याने एक रील देखील शेअर केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काय घडले, त्यानंतर अभिनेत्रीने इतकं टोकाचं पाऊल उचलले आणि गळफास घेत आयुष्य संपवलं, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायेत. 

रंजूषा मेनन पती आणि मुलांसह श्रीकार्याटमध्ये भाड्याने राहत होत्या. मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात येणार आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारमृत्यू