Join us  

साऊथची 'लेडी सुपरस्टार' नयनताराचं स्वप्न साकार, अभिनेत्रीने फोटो शेअर करून दाखवली ऑफिसची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 9:12 AM

नयनतारा ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.

नयनतारा ही साऊथ सिनेसृष्टीतील टॉप आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘लेडी सुपरस्टार’ नयनतारा हिने तिच्या वैयक्तिक जीवनात, तसेच व्यवसायात यशाची शिखरे गाठली आहेत. जवळपास दोन दशकांपासून ती साऊथ सिनेमात काम करत आहे. ही अभिनेत्री साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एका चित्रपटासाठी करोडो रुपयांचं मानधन घेते आणि लक्झरी लाइफ एन्जॉय करते. नयनतारा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना तिच्या ऑफिसची झलक दाखवली आहे. 

नयनतारा ही आलिशान घर, फ्लॅट्स आणि अपार्टमेंट्सची मालकीण आहे. आता यात एका आलिशान ऑफिसचाही समावेश झाला आहे, ज्याचे फोटो तिनं इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "एक दृष्टी निर्माण करण्याचा, आमच्या स्वप्नांचं ऑफिस तयार करण्याचा जादुई प्रवास'. यावर चाहते आणि सेलिब्रेटींनी तिच अभिनंदन केलं आहे. 

नयनतारा केवळ चित्रपटांच्या माध्यमातून कमाई करत नाही. तर, अभिनेत्री देखील एक गुंतवणूकदार देखील आहे. ती राउडी पिक्चर्स प्रोडक्शन कंपनीची मालकही आहे,  यात तिचा पती विग्नेश शिवन भागीदार आहे. नयनताराने चाय वाला, द लिप बाम आणि सौदी अरेबियातील तेल कंपनीतही गुंतवणूक केली आहे. चित्रपटाशिवाय देखील ती भरपूर कमाई करते. अभिनेत्रीने साऊथसह बॉलिवूडच्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.

टॅग्स :नयनतारासेलिब्रिटीTollywood