Join us

'पुष्पा २'ची लांबी आणखी २० मिनिटांनी वाढणार; नव्या फुटेजसह 'या' तारखेला थिएटरमध्ये रिलीज होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 13:35 IST

'पुष्पा २' सिनेमाचा Extended Cut थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. जाणून घ्या त्याबद्दल (pushpa 2, allu arjun)

'पुष्पा २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. २ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झालेला 'पुष्पा २' बघायला प्रेक्षकांची हाउसफुल्ल गर्दी झाली. 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केलीय. भारतीय मनोरंजन विश्वातील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून 'पुष्पा २'ला ओळखलं जातंय. अशातच 'पुष्पा २'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी. 'पुष्पा २'मध्ये आणखी २० मिनिटं अॅड केली जाणार असून नव्या फुटेजसह 'पुष्पा २' थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे.

'पुष्पा २'चा Extended Cut थिएटरमध्ये लवकरच

'पुष्पा २' सिनेमा २ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. तब्बल ३ तास २० मिनिटं लांबीचा हा सिनेमा प्रेक्षकांना चांगलाच आवडला. आता MovieFied Bollywood च्या रिपोर्टनुसार 'पुष्पा २'मध्ये आणखी २० मिनिटं वाढणार असून तब्बल पावणेचार तास म्हणजेच ३ तास ४० मिनिटं लांबीचा 'पुष्पा २' प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळणार आहे. येत्या ख्रिसमसच्या मुहुर्तावर २५ डिसेंबरला 'पुष्पा २' सिनेमा २० मिनिटांच्या नवीन फुटेजसह प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

'पुष्पा २'मुळे वरुण धवनच्या बेबी जॉनला मिळणार टक्कर

'पुष्पा २'च्या कमाईचं वादळ अजूनही चांगलंच घोंघावत आहे. अशातच 'पुष्पा २' Extended cut सह रिलीज झाल्यावर वरुण धवनच्या बेबी जॉनला 'पुष्पा २'चं तगडं आव्हान असेल. कारण 'पुष्पा २'चा Extended cut २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. तर वरुण धवनचा बेबी जॉन सिनेमाही २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे 'पुष्पा २' आणि वरुण धवनच्या बेबी जॉनमध्ये कोणता सिनेमा बाजी मारतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना