Join us

प्रभासच्या बहुचर्चित 'द राजा साब'चा ट्रेलर प्रदर्शित, हॉरर-कॉमेडीचा जबरदस्त तडका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:38 IST

प्रभासचा बहुचर्चित 'द राजा साब' चित्रपट थिएटरमध्ये कधी प्रदर्शित होणार, जाणून घ्या...

The Raja Saab Trailer: सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) बहुचर्चित हॉरर कॉमेडी चित्रपट 'द राजा साब'  (The Raja Saab) चित्रपटाबद्दल सध्या बरीच चर्चा आहे.चाहत्यांची प्रतीक्षा संपवत निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर The Raja Saab Trailer) रिलीज केला आहे. रिलीज होताच 'द राजा साब'च्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दिग्दर्शक मारुती यांनी 'द राजा साब'च्या माध्यमातून हॉरर कॉमेडी शैलीत पदार्पण केले आहे. ३ मिनिटे, ३४ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये रोमान्स आणि भीतीचा थरार एकाच वेळी अनुभवायला मिळतोय. ट्रेलरमध्ये एक जुन्या हवेलीचा वारसदार म्हणून प्रभासचा पात्र दिसून येतंय. तो अनेक वर्षांपासून बंद असलेल्या त्या मोठ्या आणि जीर्ण हवेलीमध्ये प्रवेश करतो. इथे आल्यानंतर त्याला समजतं की ही एक रहस्यमय आणि भुताटकी हवेली आहे, ज्याच्या भिंतींमध्ये अनेक गडद रहस्यं दडलेली आहेत. 

'द राजा साब' या चित्रपटात प्रभास दुहेरी भूमिकेत आपली ताकद दाखवणार आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यात नकारात्मक भूमिकेत (Negative Role) दिसणार आहे. या दोघांची पडद्यावरील टक्कर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'द राजा साहेब'मध्ये मालविका मोहनन, निधी अग्रवाल, ब्रह्मानंद, बोमन इराणी आणि योगी बाबू यांचाही समावेश आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार?'कल्की २८९८ एडी' नंतर प्रभास मोठ्या पडद्यावर 'कन्नप्पा' (छोटी भूमिका) वगळता फारसा दिसला नाही. त्यामुळे, त्याचे चाहते त्याच्या 'द राजा साहेब'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हॉरर कॉमेडी चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Prabhas' 'The Raja Saab' Trailer Out: Horror-Comedy Promises a Thrilling Ride!

Web Summary : Prabhas' 'The Raja Saab' trailer is released, showcasing a horror-comedy directed by Maruthi. Prabhas plays a dual role. Sanjay Dutt plays a negative role. The film is set in a haunted mansion and releases January 9, 2026.
टॅग्स :प्रभास