Join us

प्रभासने नाकारला शाहरुख खानचा सिनेमा, कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 11:43 IST

Prabhas : अलीकडेच प्रभासने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या एका मोठ्या चित्रपटाची ऑफर नाकारली. या चित्रपटात शाहरुख खानसोबत प्रभास दिसणार होता.

प्रभास (South Actor Prabhas) हा साऊथ सिनेमातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रत्येक मोठ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात त्याने काम केले आहे. प्रत्येक चित्रपट निर्माता प्रभासवर मोठी रक्कम गुंतवण्यास तयार असतो. त्यामुळेच त्याच्या चित्रपटांचे बजेट खूप मोठे असते. दक्षिणेचा यशस्वी अभिनेता असूनही प्रभासने आजपर्यंत एकाही बॉलिवूड चित्रपटात काम केलेले नाही. अलीकडे 'पठाण' दिग्दर्शकाने त्याला त्याच्या चित्रपटाची ऑफर दिल्याची बातमी आली होती, परंतु 'बाहुबली' फेम अभिनेत्याने ती ऑफर नाकारली.

मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडेच प्रभासने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या एका मोठ्या चित्रपटाची ऑफर नाकारली. या चित्रपटात शाहरुख खानसोबत प्रभास दिसणार होता. पण प्रभासने ते नाकारले. बाहुबली आणि सालार सारख्या हिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रभासला सिद्धार्थ आनंदच्या नवीन चित्रपटात मोठ्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, ज्यामध्ये त्याला शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करायची होती. पण तो म्हणाला की त्याला मल्टीस्टाररपेक्षा मध्यवर्ती भूमिका असलेले चित्रपट आवडतात.

वर्कफ्रंटबद्दल...

प्रभासच्या निवडीवरून असे दिसून येते की त्याला अशा प्रोजेक्टमध्ये जास्त रस आहे जिथे तो एकटाच मुख्य भूमिका करतो. प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तो सिंगल चित्रपटांमध्ये खूप व्यस्त आहे. त्याच्या आगामी सिनेमांसाठी चाहते उत्सुक आहेत. सध्या तो दिग्दर्शक मारुतीचा राजा साब आणि हनु राघवपुडी दिग्दर्शित 'फौजी' या चित्रपटात काम करत आहे. तो संदीप रेड्डी वंगा यांच्या स्पिरिट आणि नाग अश्विनच्या कल्की २ मध्ये देखील अभिनय करताना दिसणार आहे. प्रभासच्या या सर्व चित्रपटांचे बजेट खूप जास्त आहे.

टॅग्स :प्रभास