Join us  

नागार्जुनने मालदीवला सुनावलं, कुटुंबासोबतची ट्रीप कॅन्सल करत म्हणाला, ' पंतप्रधानांविरोधात...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 1:59 PM

नागार्जुन आपल्या कुटुंबासोबत मालदीव दौऱ्यावर जाणार होता.

मालदीव विरुद्ध लक्षद्वीप वादात आता साऊथ स्टार नागार्जुननेही उडी घेतली आहे. सोशल मीडियावर सध्या हॅशटॅग बॉयकॉट मालदीवची लाट आली आहे. त्यात नागार्जुनने कुटुंबासोबत प्लॅन केलेली मालदीव ट्रीप कॅन्सल केली आहे. पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्याने मालदीवच्या मंत्र्यांना सुनावलं आहे. 'किंमत चुकवावी लागेल' असं म्हणत त्याने मालदीववर निशाणा साधला आहे. 

नागार्जुन आपल्या कुटुंबासोबत मालदीव दौऱ्यावर जाणार होता. तिथे तो सुट्टी एन्जॉय करणार होता. मात्र मालदीवचा वाद सुरु होताच त्याने आपली ट्रीप कॅन्सल केली. गेल्या काही दिवसांपासून नागार्जुन शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यातून वेळ काढत त्याने ही ट्रीप प्लॅन केली होती. नुकतंच तो एका व्हिडिओत म्हणताना दिसत आहे की, '१७ जानेवारी रोजी मी कुटुंबासोबत मालदीवला जाणार होतो. कारण मी त्यांना वेळ देऊ शकलो नाही. ना सामी रंगा आणि बिग बॉसच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने 75 दिवसांपासून मी ब्रेकच घेतला नव्हता. मी माझे मालदीवचे तिकीट कॅन्सल केले आहेत आणि आता मी पुढच्या आठवड्यात लक्षद्वीपचं प्लॅनिंग करत आहे. तेथील मंत्र्यांनी आपल्या पंतप्रधानांविरोधात टीका केली जी आक्षेपार्ह होती आणि त्यांना किंमत चुकवावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोट्यवधी लोकांचे नेता आहेत आणि जगभरात त्यांचा सम्मान केला जातो.'

नागार्जुनचा आगामी सिनेमा 'ना सामी रंगा' लवकरच रिलीज होणार आहे. हा मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. याआधी तो 'द घोस्ट' मध्ये झळकला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो पोस्ट केले होते. यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी त्यावर टीप्पणी केली होती. पंतप्रधानांवर टीका झाल्यानंतर संपूर्ण भारतवासीयांनी मालदीवला विरोध करायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे मालदीवने संबंधित मंत्र्यांना निलंबित केले. 

टॅग्स :नागार्जुनमालदीवलक्षद्वीपनरेंद्र मोदी