Join us  

प्रसिद्ध अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत व्हिडिओ शेअर करत सांगितली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 1:16 PM

आईसोबत मंदिरात दर्शन घेऊन येत असताना सुमारे २० जणांनी हल्ला केला.

कन्नड अभिनेता चेतन चंद्रावर (Chetan Chanddrra) काल रात्री हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी रात्री बंगळुरु येथील कागलीपुरा येथे अभिनेत्यावर जवळपास २० लोकांनी हल्ला केला. चेतनने स्वत: इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली. चेतन त्याच्या आईसोबत मंदिरात दर्शन घेऊन येत असतानाच ही घटना घडली. 

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चेतन म्हणाला, "दर्शन घेऊन येत असताना सुमारे २० गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. ते नशेत होते. त्यांनी माझ्या कारला आधी धडक दिली. नंतर काहींनी कारचा पाठलाग केला. अचानक बऱ्याच गुंडांचा समूह जमा झाला आणि त्यांनी कागलीपुराजवळ माझ्यावर हल्ला केला. मला बऱ्याच जखमा झाल्या आहेत. माझं नाकही तुटलं आहे. मी स्वत:च रुग्णालयात गेलो आणि उपचार घेतले. मी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांना लवकरात लवकर शिक्षा होईल अशी मला आशा आहे." तसंच 'अत्यंत वाईट अनुभव, मला न्याय हवा आहे' असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

केतन चंद्रा लोकप्रिय अभिनेता आहे.  'पीयूसी, प्रेमिज्म','राजधानी' आणि 'जरासंध' सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये दिसला आहे. त्याचे वडील केबी रामचंद्र हे मायनिंग इंजिनिअर आहेत. 2008 साली त्याने 'पीयूसी' मधून अभिनयात पदार्पण केले. 2010 साली आलेल्या 'प्रेमिज्म' सिनेमाने त्याला खरी ओळख मिळाली. 

टॅग्स :कन्नडTollywoodसोशल मीडियासेलिब्रिटी