Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रुती मराठेच्या साऊथ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर डंका, 'देवरा'ची पाच दिवसांतच छप्परफाड कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:14 IST

'देवरा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ठाण मांडलं आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच हा सिनेमा कोटींमध्ये कमाई करत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

'देवरा' या साऊथ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत असून त्याच्या पत्नीची भूमिका मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे हिने साकारली आहे. श्रुतीचा हा साऊथ सिनेमा बॉक्स ऑफिसवर डंका वाजवत आहे. 'देवरा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ठाण मांडलं आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच हा सिनेमा कोटींमध्ये कमाई करत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

ज्युनियर एनटीआरचा हा सिनेमा २७ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. अवघ्या पाचच दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 'देवरा' सिनेमाने ८३ कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर वीकेंडलाही सिनेमाने चांगली कमाई केली. शनिवारी देवरा सिनेमाने ३९ कोटी तर रविवारी ४२ कोटींचा गल्ला जमवला. सोमवारी सिनेमाच्या किंमतीत थोडी घट झाल्याचं पाहायला मिळालं. पण, तरीदेखील १२.७५ कोटींची कमाई या सिनेमाने केली. त्यानंतर मंगळवारी सिनेमाने १३.४० कोटींचा गल्ला जमवला. आत्तापर्यंत सिनेमाने जवळपास १९०.१५ कोटींची कमाई केली आहे. 

'देवरा' सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात ज्युनियर एनटीआरबरोबर सैफ अली खान,  मुरली शर्मा, प्रकाश राज या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

टॅग्स :श्रुती मराठेज्युनिअर एनटीआरजान्हवी कपूर