Join us  

'कल्कि 2898 एडी'साठी प्रभासनं घेतलं तगडं मानधन, दीपिकासह जाणून घ्या बाकी स्टारकास्टची फी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 3:13 PM

Kalki 2898 AD Starcast Fees : 'कल्की 2898 एडी'साठी सर्व स्टार्सनी कोटींमध्ये मानधन घेतले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रभासचे मानधन अभिनेत्री दीपिका पदुकोणपेक्षा जवळपास ८ पट जास्त आहे.

बऱ्याच दिवसांपासून प्रभास (Prabhas) आणि दीपिका पादुकोण(Deepika Padukone)चे चाहते 'कल्की 2898' (Kalki 2898 AD ) ची वाट पाहत आहेत. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून स्टारकास्टचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानीसारखे स्टार्स दिसणार आहेत. या चित्रपटासाठी सर्व स्टार्सनी कोटींमध्ये मानधन घेतले आहे.

'कल्की 2898 एडी' या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्याने करोडो रुपये कमवले आहेत. प्रभास त्याच्या चित्रपटांसाठी १०० कोटी रुपये मानधन घेतो. याआधी त्याचे 'आदिपुरुष' आणि 'राधे श्याम' हे दोन चित्रपट फ्लॉप ठरले होते. असे असूनही, नवभारतच्या रिपोर्टनुसार, त्याला 'कल्की 2898 एडी' चित्रपटासाठी ५० टक्के जास्त फी मिळाली आणि त्याने १५० कोटी रुपये घेतले.

दीपिकाची फी प्रभासपेक्षा आहे खूपच कमी 'कल्की 2898 एडी'मध्ये दीपिका पदुकोण मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, तिची फी प्रभासच्या तुलनेत खूपच कमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने तिच्या शेवटच्या 'फाइटर' चित्रपटासाठी १५ कोटी रुपये घेतले होते. तर 'कल्की 2898 एडी'साठी तिने २० कोटी रुपये मानधन घेतले आहे.

बिग बींनीही घेतले इतके मानधनअमिताभ बच्चन देखील 'कल्की 2898 एडी' चा एक भाग आहेत. या चित्रपटात ते अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहेत. नुकताच या चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लूक समोर आला असून आता त्यांची फी देखील समोर आली आहे. 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारण्यासाठी बिग बींनी १८ कोटी रुपये आकारले असल्याचे बोलले जात आहे.

कमल हासन आणि दिशा पटानी यांचे मानधन'कल्की 2898 एडी'मध्ये कमल हसनचा कॅमिओ दिसणार आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्याने या चित्रपटासाठी २० कोटी रुपये घेतले आहेत. दिशा पटानी 'कल्की 2898 एडी'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटासाठी दिशाने केवळ २ कोटी रुपये फी घेतली आहे. ही अभिनेत्री अखेरची सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'योद्धा' चित्रपटात दिसली होती आणि या चित्रपटासाठीही अभिनेत्रीने तेवढीच रक्कम घेतली होती.

टॅग्स :प्रभासदीपिका पादुकोणअमिताभ बच्चन