Join us  

फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं का? 'बाहुबली' फेम प्रभाससोबत जुळले नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 11:59 AM

ही चिमुकली आज सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. आता अशाच एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो चर्चेत आला आहे.

अभिनेत्रीचा हा बालपणीचा फोटो पाहून तिला ओळखणे थोडे कठीण आहे. तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो, ही मुलगी आज सिनेसृष्टीत आपलं नावं गाजवतेय, आणि खूप प्रसिद्ध आहे. या अभिनेत्रीने सुपरस्टार प्रभास, नागार्जुन सोबत काम केले आहे. 

ही गोंडस मुलगी दुसरी कोणी नसून अनुष्का शेट्टी आहे. अनुष्काने आपल्या अभिनयाने फिल्मी जगतात आपलं स्थान निर्माण केलं आहे. 7 नोव्हेंबर 1981 रोजी कर्नाटकातील मंगळुरू येथे  जन्मलेल्या अनुष्काची आज वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. सर्वाधिक महागड्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

अनुष्का जवळपास 130 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकीन आहे.  हैदराबादच्या पॉश परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुबली हिल्समधील वुड्स अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर अनुष्काचे आलिशान घर आहे. नुकतेच अनुष्काचा 'मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.  

टॅग्स :अनुष्का शेट्टीसेलिब्रिटीTollywood