Join us  

ठरलं! ‘पुष्पा २’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, अल्लू अर्जुनच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 5:45 PM

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या प्रदर्शनाची तारीख समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

२०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या सिनेमाने सगळ्यांनाच भुरळ घातली होती. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला होता. या सिनेमातील डायलॉग आणि गाण्यांनी तर प्रेक्षकांना वेड लावलं होतं. पुष्पानंतर त्याच्या सीक्वलबाबत चर्चा रंगली होती. या चित्रपटानंतर आता ‘पुष्पा २’ची गेले कित्येक दिवस प्रेक्षक वाट पाहत आहेत. आता अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण, या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’साठी प्रेक्षकांना आणखी थोडी कळ सोसावी लागणार आहे. हा चित्रपट २०२४मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्वांतत्र्यदिनाच्या मुहुर्तावर पुष्पाचा सीक्वल प्रदर्शित केला जाणार आहे. १५ ऑगस्ट २०२४ या दिवशी ‘पुष्पा २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांकडून ट्वीट करत याबाबत माहिती देण्यात आली आहे.

“मला डॉक्टर व्हायचं होतं, पण...”, आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, “२५ लाख भरून...”

जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेश देशमुखने सोडलं मौन, म्हणाला...

‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या भूमिकेचं कौतुकही करण्यात आलं होतं. ‘झुकेगा नहीं साला’ हा त्याचा डायलॉगही प्रचंड व्हायरल झाला होता. ‘पुष्पा’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यातही आलं होतं. आता ‘पुष्पा २’ मधून तो अल्लू अर्जुन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना, फहद फॉसिल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच रश्मिकाने ‘पुष्पा २’च्या सेटवरील फोटो शेअर केला होता. त्यानंतर या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती.

टॅग्स :अल्लू अर्जुनरश्मिका मंदानापुष्पा