Join us

हातात पाईप, डोळ्यांवर चष्मा! रजनीकांतच्या 'कुली'मध्ये आमिर खानची खास भूमिका, समोर आला भन्नाट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:35 IST

रजनीकांतच्या आगामी 'कुली' सिनेमातील आमिर खानचा खास लूक रिलीज झाला आहे. यानिमित्ताने आमिर साउथ इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे

बॉलिवूड अभिनेता आमिर खान लवकरच सुपरस्टार रजनीकांतसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘कुली’ या आगामी तमिळ अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात आमिर खान एका खास कॅमियो अर्थात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. 'कुली' सिनेमातील आमिरचा पहिला लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘दहा’ या नावाने ओळखल्या जाणारा आमिरचा हा लूक त्याच्या आजवरच्या सिनेमांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. 

'कुली'मध्ये आमिरचा भन्नाट लूक

'कुली' चित्रपटातील या लूकमध्ये आमिर काळ्या रंगाच्या जर्किनमध्ये, डोळ्यांवर गॉगल आणि हातात पाइप घेऊन उभा आहे. पोस्टरमधील त्याच्या चेहऱ्यावर असलेले गूढ आणि रंजक हावभाव प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या लूकने आमिरच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. या भूमिकेविषयी बोलताना आमिर खानने सांगितले की, “जेव्हा लोकेश कनगराज यांनी मला विचारले, तेव्हा मी पटकन होकार दिला. मी रजनी सरचा खूप मोठा चाहता आहे.” या चित्रपटात आमिरची भूमिका छोटी असली तरी ती महत्त्वाची असून, कथानकाच्या निर्णायक क्षणी तो रजनीकांतच्या पात्रासमोर येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कधी रिलीज होणार ‘कुली’?

‘कुली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज करत असून, रजनीकांत यांची प्रमुख भूमिका आहे. याशिवाय नागार्जुन, उपेंद्र, श्रुती हसन, सौबिन शाहीर आणि सत्यराज हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचा भव्य सेट, उच्च दर्जाची निर्मितीमूल्यं आणि दमदार स्टारकास्टमुळे ‘कुली’कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये तो प्रदर्शित केला जाणार आहे. IMAX स्वरूपात सादर होणाऱ्या या चित्रपटाची ‘वॉर २’ या मोठ्या चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर थेट टक्कर होणार आहे.

टॅग्स :आमिर खानरजनीकांतबॉलिवूडTollywood