Join us  

बहुचर्चित 'हनुमान'च्या सीक्वलची चर्चा, 1000 कोटी बजेटची निर्मात्यांची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 12:19 PM

12 जानेवारीला रिलीज झालेला 'हनुमान' हा तेलुगू सिनेमा वर्ल्डवाईड तुफान कमाई करतोय.

साऊथ फिल्म इंडस्ट्री सध्या जगभरात गाजत आहे. एकापेक्षा एक दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ जगभरात पाहायला मिळतेय. सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाने बॉलिवूडलाही पिछाडीवर टाकत छप्परफाड कमाई केली आहे. १५ दिवसातच सिनेमाने 250 कोटींचा व्यवसाय केला.  आता सिनेमाच्या सिक्वलची जोरदार चर्चा आहे. तसंच या सिक्वलसाठी निर्माते 1000 कोटीही लावायला तयार आहेत. 

12 जानेवारीला रिलीज झालेला 'हनुमान' हा तेलुगू सिनेमा वर्ल्डवाईड तुफान कमाई करतोय. 15 व्या दिवशीही सिनेमाने 8.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सोशल मीडियावर सिनेमाची चांगलीच वाहवा सुरु आहे. अभिनेता तेजा सज्जा सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. 'हनुमान'च्या सीक्वलमध्ये रामचरण तेजाची एन्ट्री होण्याचीही चर्चा आहे. सिनेमाचं हे यश बघता मेकर्सने सीक्वलची तयारीही सुरु केली आहे. याचं नाव 'जय हनुमान' असणार आहे. निर्माते 1000 कोटीही गुंतवायला तयार आहेत मात्र ते असं करणार नाही हेही म्हणाले आहेत. 

मेकर्सकडे सध्या स्क्रीप्ट तयार आहे. पण यासाठी ते पाण्यासारखा पैसा वाया घालवणार नाहीत असंही निर्मात्यांनी सांगितलं आहे. सिनेमा सुरु करुन जेव्हाचं तेव्हाच बजेट ठरवता येईल असं ते म्हणाले आहेत असं निर्मात्यांनी ठरवलं आहे. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या आधीच 'हनुमान' सिनेमा रिलीज झाल्याने सिनेमाला याचा फायदा झाला. सिनेमाने त्यांच्या कमाईतील प्रत्येक तिकिटामागे 5 रुपये दान देण्याचेही ठरवले. याप्रकारे मेकर्सने आतापर्यंत 25 लाख रुपये राम मंदिर ट्रस्टला दिले आहेत. 

टॅग्स :Tollywoodसिनेमाराम चरण तेजा