Join us

इतकी घाई बरी नाही...! आलिया भटला आईचा सल्ला!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 16:00 IST

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता बरेच पुढे गेले आहे. सध्यातरी दोघेही काहीही लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. हे कपल लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहे. पण... आलियाच्या आईचे मानाल तर इतकी घाई बरी नाही.

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता बरेच पुढे गेले आहे. सध्यातरी दोघेही काहीही लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. हे कपल लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहे. पण... आलियाच्या आईचे मानाल तर इतकी घाई बरी नाही. होय, एका ताज्या मुलाखतीत आलियाची आई सोनी राजदान असेच काही बोलताना दिसल्या.एका ताज्या मुलाखतीत सोनी राजदान आलियाच्या रिलेशनशिपबद्दल बोलल्या. आलिया व रणबीरच्या रिलेशनशिपच्या प्रश्नांचा सामना कशा करता? असा प्रश्न सोनी राजदान यांना विचारण्यात आला. यावरच्या त्यांच्या उत्तराने अनेकांना बुचकळ्यात टाकले.

‘मी आलियाची आई आहे. मला खरोखरचं तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायला आवडत नाही. ती आनंदी राहावी, तिला जे काही हवे, ते तिला मिळावे, हीच माझी इच्छा आहे. तिला जसे जगायचे, तिने तसे जगावे,असेही मला वाटते. ती एक समजुतदार मुलगी आहे,’ असे सोनी राजदान म्हणाल्या. पण आलियाच्या लग्नाबद्दल विचारल्यावर सोनी राजदान लेकीला वेगळाच सल्ला देताना दिसल्या.

‘आई म्हणून मी आलियाला नेहमी सावध राहण्याचा सल्ला देते. आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी सध्या ती खूप लहान आहे. माझ्या मते, लग्न करण्यासाठी एक योग्य व्यक्ति मिळाली की, तुम्ही लग्नाचा निर्णय घ्यायलाच हवा. पण याचा अर्थ हा नाही की, घाईघाईत लग्न करून मोकळे व्हावे. हा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला जावा,’ असे सोनी राजदान म्हणाल्या.सोनी राजदान यांच्या या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आलियाने सध्या तरी लग्न करू नये, असे तर त्यांना सुचवायचे नाही ना, असाच प्रश्न अनेकांना पडला.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर