Join us

अरबाजसाठी मलायकाचे आयटम साँग

By admin | Updated: June 11, 2014 00:54 IST

अरबाज खानने चित्रपट बनवला, तर त्याची पत्नी मलाईका त्यात ‘आयटम साँग’ करणार हे ठरलेलेच असते.

अरबाज खानने चित्रपट बनवला, तर त्याची पत्नी मलाईका त्यात ‘आयटम साँग’ करणार हे ठरलेलेच असते. मलायकाच्या नावाने काही टिकिटं तर नक्कीच विकली जातात, हे अरबाजला चांगलेच माहिती आहे. अरबाज आता सलमान खानशिवाय ‘डॉली की डोली’ हा चित्रपट बनवत आहे. त्यात राजकुमार राव एका छोटय़ा शहरातील तरुणाची भूमिका निभावत आहे. यात मलायका ‘फॅशन खतम’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. त्यात मलाईकासोबत राजकुमारही ठुमके लगावणार आहे. अभिषेक डोग्रा हा  दिग्दर्शक असून सोनम कपूर आणि पुलकित सम्राट यांच्याही भूमिका आहेत. अरबाजचा दावा आहे की, हे आयटम साँग ‘मुन्नी बदनाम हुई’सारखेच सुपरहिट ठरेल.