Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनमने घेतली रेखाची जागा

By admin | Updated: November 7, 2014 02:21 IST

अभिनेत्री रेखा यांच्या खुबसुरत या चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका निभावणा-या सोनमने आता एका जाहिरातीत त्यांची जागा घेतली आहे

अभिनेत्री रेखा यांच्या खुबसुरत या चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका निभावणा-या सोनमने आता एका जाहिरातीत त्यांची जागा घेतली आहे. ही जाहिरात एका आंतरराष्ट्रीय चॉकलेट ब्रँडची आहे, या चॉकलेटची पहिली जाहिरात रेखा यांनी केली होती. सूत्रांनुसार एका नव्या जाहिरातीतून स्वत:ची प्रतिमा नव्याने सादर करण्याची इच्छा असणाऱ्या या ब्रँडला यावेळी त्यांच्या जाहिरातीत नवा चेहरा हवा होता. बॉलीवूडच्या अनेक तरुण कलाकारांवर विचार करण्यात आला. त्यानंतर सोनमच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. सूत्रांनुसार सोनमने या जाहिरातीची आॅफर लगेचच स्वीकारली. तिने नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग केले असून त्यासाठी चांगली रक्कमही घेतली आहे. या जाहिरातीत सोनमने रेखा यांच्यासह ऊर्मिला मातोंडकरचीही जागा घेतली आहे. तिनेही या चॉकलेटची जाहिरात यापूर्वी केली होती.